गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना सध्या घरातच विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे जनसंपर्क प्रमुख प्रथेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे. शंकरसिंह वाघेला यांना गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता. ज्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. जी पॉझिटिव्ह आली आहे. ज्यानंतर त्यांना त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी गृह विलिगीकरणात ठेवण्यात आलं आहे असंही पटेल यांनी स्पष्ट केलं. इंडियन एक्स्प्रेसला त्यांनी माहिती दिली.

करोनाच्या इतर लक्षणांपैकी कोणतीही लक्षणं वाघेला यांच्यात दिसत नाहीत. त्यांना ताप येतो आहे एवढंच एकच लक्षण त्यांच्यात दिसतं आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण असलेल्या अनेक रुग्णालयांना त्यांनी भेट दिली. त्यातून कदाचित त्यांना करोनाची लागण झाली असावी असंही पटेल यांनी म्हटलं आहे. करोना रुग्ण असलेली रुग्णालयं आणि कोविड केअर सेंटर्स या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. कदाचित त्यामुळेच त्यांना करोनाची लागण झाली असावी असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.