23 September 2020

News Flash

केरळ विमान अपघातात ठार झालेला वैमानिक महाराष्ट्राचा पुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव

कॅप्टन दीपक वसंत साठे हे माजी वायुसेना पायलट

केरळ विमान दुर्घटनेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने जीव गमावला आहे. ही दुर्घटना घडली तेव्हाच पायलटचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. हे पायलट दुसरे तिसरे कुणीही नसून महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. दीपक वसंत साठे असं अपघातात ठार झालेल्या वैमानिकाचं नाव आहे. केरळमधल्या कोझिकोड येथील विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला (Air India Express) ला भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात पायलट दीपक वसंत साठे यांचाही मृत्यू झाला आहे.

कॅप्टन दीपक वसंत साठे हे माजी वायुसेना पायलट होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. एअर फोर्समधले एक कुशल लढाऊ पायलट असा त्यांचा लौकिक होता.

काय घडलं केरळमध्ये?

केरळ विमान दुर्घटनेत १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १२३ जण जखमी झाले आहेत. केरळच्या कोझिकोड या ठिकाणी असलेल्या विमानतळावर रात्री ८ च्या सुमारास एअर इंडियाचं एक विमान लँड झालं. विमान धावपट्टीवर असतानाच हे विमान घसरलं आणि छोट्या दरीत पडलं. या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. १२३ जण जखमी झाले आहेत. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना घडताच तातडीने त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका यांच्यासह मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. आता या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 11:39 pm

Web Title: former iaf pilot deepak vasant sathe flying air india express plane killed in kozhikode crash scj 81
Next Stories
1 केरळ विमान दुर्घटना : १४ जणांचा मृत्यू १२३ जण जखमी
2 एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं
3 ५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री
Just Now!
X