17 January 2019

News Flash

‘जेम्स बॉण्ड’ अभिनेते रॉजर मूर यांचे निधन

स्वित्झर्लंड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला

ज्येष्ठ अभिनेते रॉजर मूर

सात वेळा जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रॉजर मूर यांचे कर्करोगाने मंगळवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षांचे होते. रॉजर यांच्या कुटुंबियांनी मूर यांच्या ट्विटरवरून ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली. ‘आम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की आमच्या वडिलांचं निधन झालं.’

स्वित्झर्लंड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत होता. रॉजर यांनी ‘दि स्पाय हू लव्ह मी’ आणि ‘लिव अॅण्ड लेट डाय’ या सुपरहिट बॉण्ड सिनेमांमध्ये काम केले होते. ते बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारे तिसरे अभिनेते आहेत. त्यांनी १९७३ पासून १९८५ पर्यंत जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारली होती.

रॉजरने जेम्स बॉण्ड सिनेमांशिवाय ‘दि सेंट’ या टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. आतही त्यांच्या या मालिकेतील व्यक्तिरेखेची आठवण त्यांचे चाहते करतात.

First Published on May 23, 2017 7:37 pm

Web Title: former james bond star sir roger moore dead at 89