News Flash

मुंबई २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधातील लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या माजी NSG प्रमुखांचं करोनामुळे निधन

मेदांता रुग्णालयात सुरु होते उपचार

निवृत्त आयपीएस अधिकारी आणि एनएसजीचे माजी डीजी जे के दत्त यांचं निधन झालं आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यासंबंधी समस्यांमुळे त्यांचं निधन झालं. दिल्लीमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. जे के दत्त हे पश्चिम बंगाल केडरमधील १९७१ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी होते.

जे के दत्त यांनी सीबीआय तसंच सीआयएसएफमध्ये अनेक पदांवर काम केलं. सीबीआयमध्ये असताना जे के दत्त यांनी अनेक महत्वाची प्रकरणं हाताळली होती. जे के दत्त यांनी दिल्ली विद्यापीठातून आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यांना पोलीस शौर्य पदक, गुणवंत सेवेसाठी पोलिस पदक आणि विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक देऊन गौरवण्यात आलं होतं. मुंबईत झालेल्या २६/११ हल्ल्यात त्यांनी दहशतवाद्यांशी लढा देताना नेतृत्व करत महत्वाची कामगिरी निभावली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 9:59 am

Web Title: former nsg chief j k dutt who led mumbai 26 11 counter terror ops succumbs to covid sgy 87
Next Stories
1 राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे करोनाने निधन
2 डिसेंबरपर्यंत सर्वांना करोनावरील लस मिळणार; भाजपाध्यक्ष जे पी नड्डांचं आश्वासन
3 करोनाची दुसरी लाट जुलैमध्ये संपणार; सहा महिन्यांनी येणार तिसरी लाट
Just Now!
X