भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे, अजातशत्रू, मुत्सद्दी अशी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. ते
९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जनसंघ ते भाजपच्या उभारणीतील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व असलेले अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे
झाला. कृष्णबिहारी वाजपेयी व कृष्णादेवी वाजपेयी यांचे ते पुत्र होते. ९३ वर्षीय वाजपेयी हे ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल होते. ११
जून रोजी श्वसनत्रास होऊ लागल्याने आणि मूत्रपिंडाशी संबंधित विकारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या २४ तासांपासून त्यांची
प्रकृती आणखी खालावली होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

किशोरवयीन काळापासून स्वातंत्र्यलढ्यात ते तुरुंगात गेले व काही काळ त्यांनी कम्युनिझमशी मैत्री केली. पण नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात
आले व जनसंघात त्यांनी काम केले. संघाच्या मासिकासाठी त्यांनी १९५० मध्ये शाळा सोडली व नंतर त्यांची राजकीय मुळे संघात पक्की झाली. अटलबिहारी
वाजपेयी हे तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते. १९९८ मध्ये ते केवळ तेरा दिवस पंतप्रधान होते. मे १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचण्या करण्यामागे
त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

Live Blog

17:28 (IST)16 Aug 2018
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानही एम्समध्ये

मध्य प्रदेशचे  मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान एम्समध्ये दाखल झाले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी शिवराज सिंग चौहान एम्स रूग्णालयात पोहचले आहेत. 

17:08 (IST)16 Aug 2018
वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सगळा देश प्रार्थना करतो आहे


सगळा देश अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो आहे. आम्हाला विश्वास वाटतो आहे की देव त्यांना दीर्घायुष्य देईल छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमन सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.  अटल बिहारी वाजपेयी यांना एम्स रूग्णालयात लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. 

16:54 (IST)16 Aug 2018
नितीशकुमार आणि सुशील मोदी एम्समध्ये

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी एम्स रूग्णालयात आले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांची भेट घेण्यासाठी सकाळपासूनच भाजपाच्या नेत्यांनी एम्स रूग्णालय गाठले आता नितीशकुमार आणि सुशील मोदी या दोघांनीही एम्स रूग्णालयात आले आहेत. त्यांच्यासोबत बिहारचे मंत्री नंदकिशोरही आहेत. 

16:43 (IST)16 Aug 2018
ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक भावनिक

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक भावनिक झाले आहेत. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना वाजपेयी पंतप्रधान असताना कसे काम करत, कसे निर्णय घेत  याची आठवण सांगितली. 

16:30 (IST)16 Aug 2018
देशातले अनेक लोक वाजपेयींच्या प्रकृती साठी प्रार्थना करत आहेत

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे, त्यांच्या प्रकृती स्वस्थ्यासाठी देशभरातले लोक प्रार्थना करत आहेत असे पंतप्रधानांचे माजी सल्लागार अशोक टंडन यांनी म्हटले आहे. 

16:26 (IST)16 Aug 2018
सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी एम्स रूग्णालयात

सामाजिक कार्यकर्ते आणि नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यर्थी यांनीही एम्स रूग्णालय गाठत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली.  अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले आहे 

15:50 (IST)16 Aug 2018
राहुल गांधी एम्समध्ये

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्स रुग्णालयात पोहोचले

15:41 (IST)16 Aug 2018
वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करुया: राहुल गांधी

वाजपेयीजी सध्या रुग्णालयात आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो: राहुल गांधी

14:51 (IST)16 Aug 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समधून बाहेर

वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स रुग्णालयातून बाहेर पडले.

14:46 (IST)16 Aug 2018
अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अजूनही चिंतानजक: राजनाथ सिंह

अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अजूनही चिंतानजक असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

14:22 (IST)16 Aug 2018
उद्धव ठाकरे आज रात्री दिल्लीत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज रात्री दिल्लीत जाणार.   

14:13 (IST)16 Aug 2018
एम्स रुग्णालयाबाहेर भाजपा नेत्यांची गर्दी
14:10 (IST)16 Aug 2018
वाजपेयींच्या कामाची पद्धत वेगळी होती: ममता बॅनर्जी

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आजच्या सर्व बैठका रद्द करुन दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला. मी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी होती: ममता बॅनर्जी

13:47 (IST)16 Aug 2018
वाजपेयींबद्दल काय म्हटलंय ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी?
13:42 (IST)16 Aug 2018
वाजपेयी महान नेते: पटनाईक

मी वाजपेयींसोबत दोन वर्षे काम केले आहे. ते महान नेते आहेत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज दिल्लीला रवाना होईन: ओडिशाचे मुख्यमंत्री पटनाईक

13:35 (IST)16 Aug 2018
वाजपेयींसाठी पुजाअर्चना

लुधियाना येथे वाजपेयींसाठी पुजाअर्चना केली जात आहे.


12:44 (IST)16 Aug 2018
वाजपेयींसारखा नेता होणे अशक्यच: शिवराजसिंह चौहान

वाजपेयी हे आमच्यासाठी आदर्शवत नेते होते. त्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. अटलजींसारखा नेता पुन्हा होणे अशक्यच, त्यांच्यासाठी प्रचार करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

12:40 (IST)16 Aug 2018
वाजपेयींना जगभरात शांतता हवी होती: फारुख अब्दुल्ला

वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केली पाहिजे. वाजपेयींनी देशाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना देशातच नव्हे तर जगभरात शांतता असावी असे वाटायचे हे आपण विसरू नये: फारुख अब्दुल्ला

12:38 (IST)16 Aug 2018
फारुख अब्दुल्ला दिल्लीत, वाजपेयींच्या प्रकृतीची केली विचारपूस

जम्मू- काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

12:22 (IST)16 Aug 2018
वाजपेयींसाठी विद्यार्थ्यांची प्रार्थना

लखनौतील शालेय विद्यार्थी वाजपेयींसाठी प्रार्थना करताना..

12:16 (IST)16 Aug 2018
अरविंद केजरीवाल एम्समध्ये

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एम्स रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

Delhi: Delhi CM Arvind Kejriwal and Deputy CM Manish Sisodia arrive at All India Institute of Medical Sciences where former Prime Minister #AtalBihariVaajpayee is admitted. pic.twitter.com/7clp2dTuqI


— ANI (@ANI) August 16, 2018

12:04 (IST)16 Aug 2018
अमित शाह दिल्लीत पुन्हा एम्समध्ये

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह एम्समध्ये, भाजपाशासित राज्यांमधील मुख्यमंत्रीही दिल्लीच्या दिशेने रवाना, दिल्लीतील एम्समध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची गर्दी वाढली.

11:51 (IST)16 Aug 2018
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही. भाजपाचे सगळे दिग्गज नेते एम्स रूग्णालयात दाखल झाले आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. 

11:33 (IST)16 Aug 2018
भाजपा मुख्यालयावरचे हार काढण्यात आले

दिल्लीतील भाजपा मुख्यालयावर लावण्यात आलेले हार काढण्यात आले अशी माहितीही समोर येते आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची चिंताजनक आहे. त्यांना एम्स रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी एम्स रूग्णालयात हजेरी लावली आहे.  काही वेळातच मेडिकल बुलेटीन घेतले जाणार आहे. त्यामध्ये वाजयपेयी यांच्या प्रकृती विषयीचे अपडेट्स कळू शकणार आहेत. 

11:15 (IST)16 Aug 2018
सुषमा स्वराज एम्समध्ये दाखल

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांची भेट घेण्यासाठी भाजपाच्या सगळ्याच नेत्यांनी एम्स रूग्णालयात हजेरी लावली आहे. काही वेळापूर्वीच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही एम्समध्ये दाखल झाल्या आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले . 

11:13 (IST)16 Aug 2018
अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजन असल्याचे पत्रक
11:10 (IST)16 Aug 2018
सकाळी ११.३० च्या सुमारास मेडिकल बुलेटीन

मागील चोवीस तासांपासून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. आता काही वेळात म्हणजे सकाळी ११.३० च्या सुमारास एम्स रूग्णालयातर्फे मेडिकल बुलेटीन घेण्यात येणार आहे. या बुलेटीनसाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही बोलावण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे. 

10:49 (IST)16 Aug 2018
वाजपेयींच्या आठवणीत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा भावूक
10:45 (IST)16 Aug 2018
लालकृष्ण अडवाणी एम्समध्ये
10:33 (IST)16 Aug 2018
११ जून पासून वाजपेयी रुग्णालयात

अटलबिहारी वाजपेयी यांना ११ जून रोजी श्वसनत्रास होऊ लागल्याने आणि मूत्रपिंडाशी संबंधित विकारांमुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाजपेयी यांना मधुमेह असून त्यांचे एकच मूत्रपिंड कार्यरत आहे.

10:20 (IST)16 Aug 2018
राजनाथ सिंह एम्समध्ये
10:20 (IST)16 Aug 2018
वाजपेयींना भाषण करताना बघायचंय: कांती मिश्रा
10:11 (IST)16 Aug 2018
वाजपेयींबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

१९४२- १९४५ या काळात ‘भारत छोडो’ आंदोलनातून वाजपेयी यांनी श्रीगणेशा केला. प्रथम ते कम्युनिस्ट होते व नंतर हिंदू राष्ट्रवादाकडे वळले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे ते अनुयायी होते. मुखर्जी हे भारतीय जनसंघाचे संस्थापक होते.

10:02 (IST)16 Aug 2018
वाजपेयींसाठी देशभरात पूजाअर्चना

Gwalior: Students of Government Ayurvedic College pray for health of former prime minister Atal Bihari Vajpayee who is admitted at AIIMS and is in critical condition. #MadhyaPradesh pic.twitter.com/TImYv5QFLe— ANI (@ANI) August 16, 2018

10:02 (IST)16 Aug 2018
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह एम्समध्ये
10:01 (IST)16 Aug 2018
राहुल गांधी, ममता बॅनर्जी घेणार भेट

वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या आज एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतील. 

वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.