News Flash

वाजपेयींची प्रकृती स्थिर; उपचारांसाठी रुग्णालयात ठेवावे लागणार : एम्स

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना मुत्रसंसर्ग झाल्याने अधिक उपचारांसाठी रुग्णालयात ठेवावे लागणार आहे.

Prime Minister Atal Bihari Vajpayee: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना मूत्रसंसर्ग झाला असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. त्यांचे डायलसिस झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सने आपल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे. Express archive photo by Mohan Bane

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना मुत्रसंसर्ग झाल्याने अधिक उपचारांसाठी रुग्णालयात ठेवावे लागणार आहे, असे दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने मंगळवारी मेडिकल बुलेटिनद्वारे सांगितले आहे.


वाजपेयी उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांना प्रतिजैविके देण्यात आली आहेत. त्यांच्या सर्व महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचे रिपोर्ट्स सामान्य आहेत. ९३ वर्षीय वाजपेयींना मुत्रसंसर्ग झाल्याने सोमवारी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाले असून सध्या त्यांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

एम्सचे संचालक पल्मोनोलॉजिस्ट डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचे पथक वाजपेयींच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहेत. यामध्ये नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सौमित्र बागची, कार्डियाक सर्जन डॉ. एस. के. चौधरी आणि गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉ. प्रमोद गर्ग यांचा समावेश आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांची भेट घेतली होती. तर, मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाजपेयींची भेट घेतली.

वाजपेयी हे २००९ पासून स्मृतीभ्रंशाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही कार्यक्रमात दिसलेले नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 2:07 pm

Web Title: former pm atal bihari vajpayees condition is stable he is responding to treatment medical bulletin of aiims
Next Stories
1 Social Viral : आयुष्यात तक्रार करण्याआधी ‘या’ आजीबाईंचा व्हिडीओ पहाच
2 Donald Trump Kim Jong Un summit : जगाला एक नवा बदल पहायला मिळेल, ट्रम्प भेटीनंतर किम जोंग यांचं आश्वासन
3 Rahul Gandhi Attacks Modi Government : विचारधारेसाठी माझी लढाई सुरु राहणार – राहुल गांधी
Just Now!
X