03 March 2021

News Flash

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर, आर्मी रुग्णालयात उपचार

आजच प्रणव मुखर्जींची करोना टेस्ट आली पॉझिटिव्ह

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. आजच त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर करोनाचेही उपचार सुरुच होते. आता त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे अशी माहिती मिळते आहे.

आजच प्रणव मुखर्जींना दिल्लीतल्या आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती. ती शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते. आज त्यांच्या प्रकृतीचे वृत्त कळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या मुलीकडे म्हणजेच श्रर्मिष्ठा मुखर्जी यांच्याकडे चौकशी केली. लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

प्रणव मुखर्जींनी आजच्या ट्विटमध्ये काय म्हटलं?

प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 10:19 pm

Web Title: former president pranab mukherjee is on ventilator support at armys rr hospital scj 81
Next Stories
1 काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’; अखेर सचिन पायलट यांचं बंड शमलं
2 सरकार ग्रॅच्युईटीचे नियम बदलणार?; पाच वर्षांपेक्षा कमी नोकरी झालेल्यांना मिळणार फायदा
3 Coronavirus : मास्क न घातल्यास उद्यापासून ‘या’ राज्यात १ हजार रुपये दंड
Just Now!
X