News Flash

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल

त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संग्रहित छायाचित्र

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णलायात हलवण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार असल्यानं त्यांना रुग्णालात दाखल करण्यात आलं. त्यांना सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री ८.४५ च्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच सध्या ते डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 10:25 pm

Web Title: former prime minister dr manmohan singh has been admitted to all india institute of medical sciences jud 87
Next Stories
1 १२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण
2 जर्मनीच्या मॅगझीनचा ‘तो’ दावा असत्य आणि निराधार; WHO चं स्पष्टीकरण
3 CBSE: तीन हजार केंद्रांवरुन दीड कोटी उत्तरपत्रिकांची तपासणी सुरु; ५० दिवसांत पूर्ण होणार काम
Just Now!
X