पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांतसिंग आणि अन्य १७ जणांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या शीख दहशतवाद्याला थायलंडमध्ये अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक झालेल्या दहशतवाद्याचे नाव गुरमितसिंग ऊर्फ जगतार तारासिंग असे असून त्याला जोन बुरी या पूर्वेकडील प्रांतातून अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या नागरिकाच्या मालकीच्या घरावर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
गुरमितसिंग हा बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय शीख फुटीर गटाचा माजी सदस्य असून तो ऑक्टोबर महिन्यांत थायलंडमध्ये आला. चंदीगडमधील कारागृहातून तो पसार झाला होता. प्रांतीय पोलीस आणि सैनिकांनी संयुक्तपणे घरावर छापा टाकून त्याला बांग लामुंग जिल्ह्य़ातून अटक केली.
पोलिसांनी या वेळी पाकिस्तानचा नागरिक असलेला घरमालक अली आलट यालाही अटक केली. मात्र गुरमितसिंग याच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीची कल्पना नव्हती, असे आलट याने सांगितले.