News Flash

ट्विट्स आपोओप डिलीट होत असल्याने सुरेश प्रभू चिंतेत, ट्विटर इंडियाकडे तक्रार

सुरेश प्रभू यांनी आपल्या मित्र आणि फॉलोअर्सना यासंबंधी माहिती दिली आहे

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या टाइमलाइवरुन काही ट्विट आपोआप डिलीट होत आहेत. सुरेश प्रभू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून यासंबंधी माहिती दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री असताना ट्विटरवर सक्रीय राहत प्रवाशांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतल्याने सुरेश प्रभू नेहमी चर्चेत असायचे. ट्विट डिलीट होत असल्याने सुरेश प्रभू चिंतेत असून त्यांनी यासंबंधी ट्विटर इंडियाकडे तक्रार केली आहे.

सुरेश प्रभू यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्या प्रिय मित्रांनो. एक विचित्र ट्रेण्ड माझ्या लक्षात आला आहे. माझ्या टाइमलाइनवरुन अनेक पोस्ट डिलीट होत आहेत. @TwitterIndia ने कृपया याची दखल घ्यावी’. याशिवाय काही फॉलोअर्सही कमी झाल्याचं लक्षात आलं आहे असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे.

‘गेले काही दिवस केलेल्या निदर्शनानुसार, फॉलोअर्स हटवण्यात आले आहेत. आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना किंवा माहिती न देता हे केलं जात आहे’, असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे. त्यांनी आपल्या मित्र आणि फॉलोअर्सना यासंबंधी माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं असून नुकताच शपथविधी पार पडला. गेल्या सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री आणि नंतर वाणिज्य मंत्रीपद मिळालेल्या सुरेश प्रभू यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 1:58 pm

Web Title: former railway minister suresh prabhu tweets delete twitter india
Next Stories
1 NSA अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा
2 महिलांना बस आणि मेट्रोचा मोफत प्रवास, दिल्ली सरकारचा निर्णय
3 एस. जयशंकर गुजरातमधून राज्यसभेवर जाणार ?
Just Now!
X