26 September 2020

News Flash

माजी केंद्रीय मंत्री नेपोलियन भाजपमध्ये

द्रमुकमध्ये पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव आहे असा आरोप करत माजी केंद्रीयमंत्री डी. नेपोलियन यांनी भाजपत प्रवेश केला आहे.

| December 22, 2014 01:49 am

द्रमुकमध्ये पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव आहे असा आरोप करत माजी केंद्रीयमंत्री डी. नेपोलियन यांनी भाजपत प्रवेश केला आहे. तामिळनाडूत २०१६ मध्ये विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत नेपोलियन यांनी भाजपत प्रवेश केला.
  शहा यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजपमध्ये सामील झालेले ते तिसरे नेते आहेत. राज्यातील गीतकार गंगाई अमरान व वेशभूषाकार गायत्री रघुराम यांनी भाजपत प्रवेश केला आहे. नेपोलियन हे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राजवटीच्या काळात सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 1:49 am

Web Title: former union minister d napoleon quits dmk to join bjp
टॅग Bjp,Chennai
Next Stories
1 जनता परिवाराचे आज दिल्लीत सरकारविरोधी आंदोलन
2 अमेरिकेत दोन ‘गोऱ्या’ पोलिसांची हत्या
3 देशांतर्गत युरेनियम उत्पादनात १० ते १५ टक्क्य़ांची घट
Just Now!
X