तत्कालीन पश्चिम जर्मनीचे माजी चॅन्सेलर हेल्मट श्मिड् ट (वय९६) यांचे निधन झाले. युरोपीय राजकारणातील स्पष्टवक्ते असलेले नेते म्हणून ते परिचित होते. कारकीर्दीच्या अखेरच्या काळाक त्यांना जास्त आदरसन्मान मिळाला. श्मिड्ट यांनी १९७४ ते १९८२ दरम्यान पश्चिम जर्मनीचे नेतृत्व केले असून त्यावेळी तो देश आर्थिक शक्तीकेंद्र होता. श्मिड्ट हे सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे होते, त्यांनी मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करताना अति डाव्या रेड आर्मी गटाशी झुंज दिली.