लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप एक वर्ष असताना समाजवादी पार्टीने गुरुवारीच आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केल्याने मध्यवधी निवडणुका होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ते रामगोपाळ यादव यांनी याबाबत एक निवेदन प्रसृत केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, बरेली मतदारसंघातून आयेशा इस्लाम यांना तर फारुखाबाद मतदारसंघातून सचिनसिंग यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आंबेडकरनगर आणि संत कबीरनगर मतदारसंघातून अनुक्रमे हिरालाल यादव आणि अब्दुल कलाम यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. बागपत मतदारसंघात उमेदवारीत बदल करण्यात आला असून विजयकुमार यांच्याऐवजी सोमपाल शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लालगंज मतदारसंघातून दूधनाथ सरोज यांच्याऐवजी दरोगाप्रसाद सरोज यांना तर आग्रा मतदारसंघातून महाराजसिंग धनगर यांच्याऐवजी सारिका बागेल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.