28 September 2020

News Flash

घरावर खडक कोसळल्याने चार जणांचा मृत्यू

एकजण गंभीर जखमी, मदतकार्य सुरू

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमधील  घोरडी येथील एका घरावर मोठा खडक कोसळल्याने चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय एकजण गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

या घटेनत मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. जम्मूमधील रामबन येथे रविवारी सकाळी महामार्ग बंद असल्याने वाहनं रस्त्यावरच उभी होती. या वेळी डोंगरावरून गडगडत आलेल्या मोठा खडक दोन वाहनांवर आदळल्याने यामध्ये एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. शिवाय, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसानही झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 9:39 am

Web Title: four dead one injured after a boulder fell on a house msr 87
Next Stories
1 मध्य प्रदेश सरकार पाडण्यात अजिबात रस नाही – शिवराज सिंह चौहान
2 ज्योतिरादित्य सिंधिया यांचे भाजपात नक्कीच स्वागत : नरोत्तम मिश्रा
3 मध्य प्रदेशात राजकीय धुळवड रंगात; कमलनाथ सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे
Just Now!
X