कोलकाता – मुस्लिम धर्मांचे असल्यामुळे भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या चार विद्यार्थांवर घर खाली करायचा दबाव दिला जात आहे. कोलकातामधील कुढाघाट येथे मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार विद्यार्थांबरोबर हा प्रकार घडला आहे. आफताब आलम, मोज्तबा हसन, नासिर शेख आणि सौकत शेख अशी त्या चार विद्यार्थांची नावे आहेत. कुढाघाटमधील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे हे विद्यार्थी इतर रूग्णालयात स्टायफंडवर काम करत आहेत. घर खाली करण्यासाठी दबाव टाकणाऱ्यांविरोधात या चार जणांनी वॉलनटिअर्स ग्रुप संघाती अभिजान यांची मदत घेतली आहे.

कुढाघाट येथील आपल्या भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या या विद्यार्थांना सध्या घर शोधताना जात आणि धर्मांचा सामना करावा लागत आहे. यापैकी एक असेलेल्या आफताबने सांगितले की, गेल्या दोन महिन्यापासून आम्ही येथे राहतोय. आमच्या घरमालकाला काही अडचण नाही. पण पहिल्यापासून शेजाऱ्यांनी आमच्या जातीमुळे आम्हाला टार्गेट केले. सोमवारी एक मित्र भेटायला आल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. काही शेजाऱ्यांना त्याला अनेक प्रश्न विचारले शिवाय त्याच्याकडे ओळखीचा पुरवाही मागितला. विचारपूस करणाऱ्या एका शेजाऱ्याने मुस्लिम असल्याचे सांगत आम्हाला दुसरीकडे घर पाहण्याचा सल्ला दिला. पुढे बोलताना आफताब म्हणाला की, यापूर्वीही मुस्लिम असल्यामुळे अनेक ठिकाणी घर भाड्याने देण्यास नकार दिला. सध्या राहत असलेले घर आम्हाला खूप फिरल्यानंतर मिळाले आहे.

चारही विद्यार्थी अद्याप कुड्डाघाट येथील त्याच भाड्याच्या घरात राहत आहेत. सध्या आम्ही घर बदलण्याचा विचार करत आहे. शांतता नसेल तर तेथे रहायचे कसे असे सौकत शेख म्हणाला. मी मुस्लिम मुलांना भाड्याने घर दिल्यामुळे काही शेजाऱ्यांनी मला विरोध केला. त्यांना बाहेर काढण्यासाठी मला सातत्याने दबाव निर्माण केला असे घरमालकाने सांगितले.

दरम्यान, आम्ही शेजारी आणि स्थानिक प्रशासनाशी बातचित करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे संघाती अभिजानाचे द्वाईपअन बनर्जी म्हणाले आहेत.