सरकारी तसेच खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना प्रॉविडंट फंडाचं चांगलं नियोजन करता यावं व आपला निधी योग्य प्रकारे हाताळता यावा यासाठी एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशन विविध उपाय योजत आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे पीएफच्या किंवा भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात किती निधी जमा झालाय याची वेळोवेळी माहिती देण्याची सोय आहे.

त्यामुळे आपत्कालिन स्थितीमध्ये पीएपमधून पैसे काढायचे असतील, कर्ज घ्यायचं असेल किंवा निवृत्तीनंतरचं नियोजन करायचं असेल तर हवं तेव्हा बॅलन्स तपासायची सोय महत्त्वाची ठरते. त्याप्रमाणेच एम्प्लॉयर पगारातून पीएफ कापून घेतो परंतु तो खात्यात भरला जातो की नाही याची पण खात्री यामुळे करून घेता येते. विशेषत: खासगी क्षेत्रातल्या काही कंपन्या कर्मचाऱ्यांचा पीएफ पगारातून कापतात परंतु पीएफ खात्यात भरत नाहीत, आणि कंपनी सोडताना कर्मचाऱ्याच्या लक्षात येतं की आपली फसगत झालीय.

आता नवीन यंत्रणा सज्ज झाली असून एम्प्लॉई प्रॉविडंट फंडचा बॅलन्स चेक करणं एकदम सोपं झालंय. कुठूनही व कधीही हा बॅलन्स चेक करता येणं शक्य आहे. त्यासाठी ईपीएफच्या कार्यालयात जाऊन रांगेत उभं राहण्याची गरज नाहीये.

चार प्रकारे तुम्हाला तुमच्या पीएफचा बॅलन्स तपासण्याची सोय आहे.
ईपीएफओच्या वेबसाईटवर, ईपीओफओच्या अॅपवर, एसएमएसच्या माध्यमातून किंवा मिस कॉल देऊन.

– वेबसाईटवर बॅलन्स चेक करण्यासाठी https://epfindia.gov.in/site_en/index.php इथं भेट द्या. त्यासाठी तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिवेट केलेला असण्याची गरज आहे. हा क्रमांक ईपीएफओ देतं व एम्प्लॉयर तो अॅक्टिवेट करतो. नोकरी बदलली तरी हा युएएन क्रमांक बदलत नाही, तो कायम राहतो.
तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाइलच्या माध्यमातून तुम्ही या पोर्टलवर पासवर्ड सेट करू शकता आणि नंतर तिथं दिलेल्या सूचनांनुसार पासबुकच्या माध्यमांमधून पीएफ बॅलन्स चेक करू शकता.

– ईपीएफओचं अॅप प्ले स्टोअरमध्ये असून ते डाऊनलोड करून मेंबर लॉगइनच्या ऑप्शनमधून बॅलन्स चेक करायची सोय आहे. इथंही नोंदणी असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून जोडणी केली जाते.

– केवायसी डिटेल्स पूर्ण झाले असतील तरच एसएमएसच्या माध्यमातून बॅलन्स जाणून घेता येतो. EPFOHO UAN ENG असा मेसेज टाइप करायचा ENG च्या जागी MAR टाइप केलं तर मराठीत माहिती मिळेल. आपला UAN त्यात टाकून हा मेसेज 7738-299-899

– नोंदणीकृत मोबाइलवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यावर एसएमएस येतो आणि पीफच्या डिटेल्स तुम्हाला कळवल्या जातात.