News Flash

पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश भेटीस विरोध दर्शवणाऱ्या चार आंदोलकांचा मृत्यू

ढाका येथे पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात दोन पत्रकारांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश भेटीला विरोध दर्शवण्यासाठी निदर्शनं करणाऱ्यांवर पोलिसांकडून रबरी बुलेट्सचा मारा करण्यात आला. ज्यात बांगलादेशमधील चित्तागोंग येथे चार जणांचा मृत्यू झाला. असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घुसलेल्या व मोठ्या प्रमाणात तोडफोड करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा व रबरी बुलेट्सचा मारा केला. अशी माहिती रफिकुल इस्लाम या पोलीस अधिकाऱ्यांने रॉयटरला बोलताना दिली.

बांगलादेशची राजधानी ढाका येथे देखील पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काही जणांकडून निषेध दर्शवण्यात आला. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात दोन पत्रकारांसह अनेकजण जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी तिथं पोहचले आहेत. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्याचे स्वागत केले व मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. या ठिकाणी पोहचल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी ढाकामधील सावर येथील शहीद स्मारकास भेट दिली. या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केलं व तेथील व्हिजिटर्स बुकमध्ये संदेश लिहून स्वाक्षरी केली.

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती – पंतप्रधान मोदी

यानंतर ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी बांगलादेशातील बंधू व भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 8:59 pm

Web Title: four killed in bangladesh during protests against pm modis visit msr 87
Next Stories
1 निकिता तोमर हत्या प्रकरण : ५ महिन्यांनंतर मिळाला न्याय, आरोपींना जन्मठेपेची शिक्षा!
2 बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती : मोदी
3 “…फक्त मोदींची दाढी वाढतेय”, ममता बॅनर्जींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला!
Just Now!
X