29 September 2020

News Flash

सीमारेषेवर सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार

जम्मू-काश्मिरमधील तांगधर सेक्टरमध्ये शनिवारी पहाटे भारतीय सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मृत्यमूखी पडले. कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर येथे ही चकमक झाली असून, लष्कराच्या अधिकृत सूत्रांकडून

| September 20, 2014 02:09 am

जम्मू-काश्मिरमधील तांगधर सेक्टरमध्ये शनिवारी पहाटे भारतीय सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मृत्यमूखी पडले. कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर येथे ही चकमक झाली असून, लष्कराच्या अधिकृत सूत्रांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. या दहशवाद्यांकडून चार एके-४७ रायफल्स आणि शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. मात्र, हे दहशतवादी कोणत्या अतिरेकी संघटनेचे आहेत, याबद्दल अद्याप निश्चित माहिती मिळू शकली नसल्याचे लष्कराच्यावतीने सांगण्यात आले.
यापूर्वी भारत-पाक सीमारेषेवर तब्बल २०० दहशतवादी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती, शनिवारी भारतीय लष्करातर्फे देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 2:09 am

Web Title: four militants killed in gunbattle with security forces
टॅग Security Forces
Next Stories
1 छत्तीसगडमधील पोटनिवडणुकीत भाजपची सरशी
2 विशेष : स्कॉटलंड यार्ड ‘अखंड’!
3 बंगळुरूमध्ये ३५० विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा!
Just Now!
X