06 December 2020

News Flash

काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांकडून चार पोलिसांची हत्या

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्य़ातील सोपोर भागात दहशतवाद्यांनी शुक्रवारी चार पोलिसांची हत्या केली. श्रीनगरपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या हैगम येथील सोपोर-कुपवाडा मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या

| April 27, 2013 03:42 am

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्य़ातील सोपोर भागात दहशतवाद्यांनी शुक्रवारी चार पोलिसांची हत्या केली. श्रीनगरपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या हैगम येथील सोपोर-कुपवाडा मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक अब्दुल गनी मिर यांनी दिली.
दरोडय़ाच्या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी पोलीस पथक जात असताना  दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी तसेच दोन विशेष पोलीस अधिकारी शहीद झाल्याचे मिर यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.
गेल्या आठवडय़ात ‘लष्कर ए तयबा’चा कडवा अतिरेकी कारि नावीद उर्फ फहादुल्ला याच्या अटकेनंतर प्रथमच एवढया मोठय़ा प्रमाणात उत्तर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 3:42 am

Web Title: four police murdered by terrorist in kashmir vally
टॅग Terrorist
Next Stories
1 गोव्यातील खरेदीवर परदेशी पर्यटकांना ‘व्हॅट’ परतावा!
2 भारतीय कैदी सरबजित सिंग कोमात, प्रकृती स्थिर होईपर्यंत सर्जरी अशक्य
3 कोळसा खाण घोटाळ्याचा अहवाल अश्वनीकुमारांना दाखविला होता: सीबीआयचे प्रतिज्ञापत्र
Just Now!
X