इंडियानापोलिस येथे  फेडएक्स बँकेच्या आवारात एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात एकूण आठ लोक मारले गेले होते, त्यात शीख समुदायाच्या चार जणांचा समावेश असून भारतीय अमेरिकी समुदायाने या हल्ल्याबाबत दु:ख, संताप व चिंतेची भावना व्यक्त केली आहे.

ब्रँडन स्कॉट होल (वय १९) हा इंडियाना पोलिस येथील बँकेचा माजी कर्मचारी होता. त्याने गुरुवारी रात्री उशिरा केलेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले होते, नंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. या बँक आस्थापनेतील नव्वद टक्के कर्मचारी हे भारतीय अमेरिकी समुदायाचे असून त्यात शिखांचे प्रमाण अधिक आहे.

शुक्रवारी रात्री मॅरियन परगण्याच्या शवविच्छेदन कार्यालयाने तसेत इंडियानापोलिसच्या पोलीस खात्याने  मृतांची नावे जाहीर केली असून त्यात अमरजित जोहल (वय६६), जसविंदर कौर (वय६४), अमरजित सेखाँ (वय४८), जसविंदर सिंग (वय६८)  यांचा समावेश आहे. पहिल्या तीन मृतात महिलांचा समावेश आहे. इतर चार जणांत कार्ली स्मिथ (१९), समारिया ब्लॅकवेल (१९), मॅथ्यू अ‍ॅललेक्झांडर (वय३२) व जॉन वेसर्ट (वय७४) यांचा समावेश आहे. अमरजित जोहल यांची पुतणी कोमल चोहान ही दु:खावेगात म्हणाली, की आता पुरे झाले. मी अक्षरश: कोसळले आहे. माझी आजी अमरजित जोहल हिचा मृतांमध्ये समावेश आहे. फेडएक्सच्या आवारातील गोळीबारात ती ठार झाली. आमचे अनेक कुटुंबीय वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात, ते घाबरले आहेत.  जसविंदर सिंग याला पगाराचा पहिला धनादेश मिळण्याआधीच त्याचा  गोळीबारात मृत्यू झाला. त्याचे नातेवाईक हरजाप सिंग यांनी सांगितले, की तो साधा माणूस होता. तो प्रार्थना, ध्यानधारणा करीत होता. अमरजित सेखाँ याचाही गोळीबारात मृत्यू झाला, तो सहा महिन्यांपूर्वी कामाला लागला होता. त्याच्या पश्चाात दोन मुले आहेत. त्यांना आई नाही.  रिम्पी गिर्न या सेखाँ यांच्या पुतणीने सांगितले, की अमरजित याच्या मृत्यूचे दु:ख मोठे आहे. त्याच्या मुलांना आम्ही काय सांगणार आहोत. जसविंदर कौर ही सेखाँ याच्यासोबत नेहमी फेडएक्समध्ये  जात असे. ती नातीचा वाढदिवस शनिवारी साजरा करणार होती. पण आज अंत्यविधीची तयारी करावी लागली. कमल जवांदा याचे आईवडील मात्र वाचले.