News Flash

आंध्र प्रदेशातील भीषण अपघातात चार स्पॅनिश नागरिकांचा मृत्यू

मृतात स्थानिक बस चालकाचाही समावेश

अपघातग्रस्त बस

कंटेनरने बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये स्थानिक बस चालकासह चार जण पर्यटनासाठी आलेले स्पेनच्या नागरिकांचा समावेश आहे. तर इतर दोन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी चित्तूर जिल्ह्यात ही दुर्घटना घडली.


चित्तूर पोलिसांच्या माहितीनुसार, पुदुच्चेरीवरून ११ स्पेनच्या पर्यटकांचा जत्था पुथ्थापर्थी येथे जात असताना हा भीषण अपघात झाला. हे सर्व पर्यटक ‘रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ नामक संघटनेच्या विकासकामांची माहिती घेण्यासाठी निघाले होते.

बंगळूर महामार्गावरील अपघातात या बसमधीलतील चार जणांचा मृत्यू झाला तर इतर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चित्तूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पी. एस. प्रद्युम्न म्हणाले, जखमींवर व्यवस्थित उपचार सुरु असून मृतांच्या शवविच्छेदनाचे कामही वेळेत पूर्ण होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2017 7:34 pm

Web Title: four spanish nationals among five killed in andhra pradesh road accident
Next Stories
1 व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती
2 २५६ वर्षे जगलेल्या माणसाची गोष्ट!
3 ट्रम्प माझे भाऊराया…हरयाणातील महिलांनी पाठवली राखी
Just Now!
X