नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदी या दोघांची स्विस बँकेतली चार खाती ईडीच्या सांगण्यावरून गोठवण्यात आली आहेत. पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे दोघेही पळाले आहेत. या दोघांच्याही प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून प्रयत्न होत आहेत. याआधी नीरव मोदीचा बंगलाही पाडण्यात आला आहे. तसेच त्याची इथली स्थावर-जंगम मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाच्या सांगण्यावरून स्विस बँकेने नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदी यांची खाती गोठवली आहेत.

भारतात गैरव्यवहार करून नीरव मोदी गेल्या दीड वर्षापासून फरार झाला आहे. नीरव मोदीविरोधात लंडनच्या वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. हे अटक वॉरंट जारी केल्यानंतर दोन दिवसातच नीरव मोदीला पोलिसांनी अटक केली. आता त्याची स्वित्झर्लंडमधील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सरकारचे हे मोठे यश मानले जाते आहे.