08 March 2021

News Flash

हैदराबादमध्ये चार दहशतवाद्यांना अटक

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये पोलीसांनी चार संशयित दहशतवाद्यांना शुक्रवारी अटक केली.

| August 14, 2015 01:26 am

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये पोलीसांनी चार संशयित दहशतवाद्यांना शुक्रवारी अटक केली. अटकेत असलेले चौघेही जण परदेशी नागरिक असून ते हुजी या संघटनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी दोघेजण बांगलादेशमधील असून, एक जण पाकिस्तानी तर एक जण म्यानमारमधील आहे. स्वातंत्र्य दिनी देशात घातपाती कारवाया करण्याचा त्याचा कट होता. पोलीसांनी या चौघांना अटक केल्यामुळे त्यांचा कट उधळला गेला आहे. जुन्या हैदराबादमधून या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत आणखी कोणी दहशतवादी आहेत का, याच पोलीस कसून तपास करीत आहेत. देशभरात शनिवारी ६९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:26 am

Web Title: four terrorist arrested in hyderabad
टॅग : Terrorism,Terrorist
Next Stories
1 लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब
2 मॅगीवरील बंदी उठवली, सहा आठवड्यांनंतर विक्री
3 स्वातंत्र्य दिनी पाकिस्तानी जवानांच्या शुभेच्छा व मिठाई न स्वीकारण्याचा निर्णय
Just Now!
X