News Flash

हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरसह लश्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये जवानांच्या हाती मोठे यश

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनाच्या हाती मोठे यश आले आहे. अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर अद्यापही या ठिकाणी एक दहशतवादी या दडून बसल्याची माहिती समोर आली असून, घटनास्थळी चकमक सुरू आहे. जवानांनी परिसरास वेढा दिलेला आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील दियलगाम भागात दहशदवादी दडून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरु केली होती. दरम्यान, परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांनावर गोळीबार सुरू केला. प्रत्त्युतरात जवानांनी केलेल्या गोळीबारात चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. एसओजी, १६४- सीआरपीएफ आणि १९-आरआर या तुकड्यांच्या जवानांनी मिळून ही संयुक्त मोहीम राबवली आहे.

प्राप्त माहितीनुसार अनंतनागमधील चकमकीत हिजबुलचा कमांडर आणि लश्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. या अगोदर शोपिया जिल्ह्यातील खाजपुरा रेबन भागात जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 1:22 pm

Web Title: four terrorists have been killed by security forces msr 87
Next Stories
1 Coronavirus : इराणमध्ये अडकलेले २३६ भारतीय मायदेशी परतले
2 डोनाल्ड ट्रम्प यांनी केली करोना चाचणी, आला ‘हा’ रिपोर्ट
3 कमलनाथ सरकारचं काय होणार? १६ मार्चला बहुमत चाचणीचे राज्यपालांचे आदेश
Just Now!
X