ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासांत प्रथमच चार हजार बळी गेले असून ही दैनंदिन संख्या गाठणारा ब्राझील हा तिसरा देश ठरला आहे. ब्राझीलमधील अनेक गव्हर्नर्स, महापौर व न्यायाधीश  यांनी ब्राझीलमधील बरेच निर्बंध खुले करण्याचे आदेश दिले असून त्यामागे अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचा हेतू होता. पण प्रत्यक्षात रुग्णवाढ होऊन रुग्णालय व्यवस्था कोलमडली आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ४१९५ बळी गेले असून ही संख्या चोवीस तासांतील आहे. देशातील बळींची संख्या ३ लाख ४० हजारांच्या आसपास येत आहे. अमेरिका व पेरू या दोन देशातच या आधी दैनंदिन चार हजार बळी गेले आहेत. साओ पावलो ब्राझीलमधील सर्वाधिक  लोकसंख्या असलेले शहर असून तेथील लोकसंख्या ४ कोटी ६० लाख आहे तेथे १४०० बळी गेले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्टरच्या सुटीमुळे हा परिणाम झाला असावा. स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, दुर्लक्षामुळे लोक रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होत आहे.