भोपाळ : मध्य प्रदेशात रेडिओ कॉलर लावण्यात आलेल्या एका वाघिणीचा पन्ना अभयारण्यात मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या दहा दिवसांत विविध अभयारण्यात चार वाघांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी घारीघाट परिक्षेत्रात एका वाघिणीचा मृतदेह सापडला असून पन्ना अभयारण्य भोपाळपासून ३५० कि.मी अंतरावर आहे. १२ मे रोजी या वाघिणीच्या डाव्या पायाला सूज आली होती. नंतर तिला इंजेक्शनने शांत करून पुन्हा सोडून देण्यात आले. शनिवारी वन अधिकाऱ्यांना या वाघिणीचा मृतदेह सापडला असून तिची शिकार झाल्याची शक्यता नाही.कोत्याआधी शुक्रवारी बांधवगड अभयारण्यात एका वाघाचा मृतदेह सापडला होता. ८ मे रोजी कान्हा व्याघ्र अभयारण्यात एका वाघाचा मृत्यू झाला होता.  सात मे रोजी वारासिवनी तहसीलात एका १२ ते २४ महिन्यांच्या वाघाचा मृत्यू झाला होता.

मध्य प्रदेशात कान्हा, बांधवगड, पेंच, सातपुडा व पन्ना ही व्याघ्र अभयारण्ये असून राज्याने २०१८ मध्ये वाघांच्या संख्येत पहिला क्रमांक मिळवला असून तेथे ५२६ वाघ आहेत.