News Flash

मोठी बातमी…चौथ्या टप्प्यातली जेईई मेन परीक्षा स्थगित!

देशातली सध्याची परिस्थिती पाहता घेतला निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

जेईई मेनची चौथ्य़ा टप्प्यात होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. यंदाची परीक्षा चार टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी दोन टप्प्यांमधली परीक्षा पार पडली होती. तिसऱ्या टप्प्यातली परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती आणि आता चौथ्या टप्प्यातली परीक्षाही स्थगित करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी जेईई मेन ही परीक्षा चार टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २३ ते २३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान या परिक्षेचा पहिला टप्पा पार पडला. तर दुसरा टप्पा १६ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत पार पडला.

तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २७,२८ आणि ३० एप्रिल२०२१ दरम्यान होणार होती. मात्र, देशातला करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता चौथ्या टप्प्यातल्या परीक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे. २४ ते २८ मे २०२१ या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार होती.

या चौथ्या टप्प्यातल्या परिक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार असून त्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना अगोदर दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 4:04 pm

Web Title: fourth session of jee mains exam is postponed due to corona scenario in india vsk 98
Next Stories
1 “नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन निरुपयोगी; कडक लॉकडाउनच हवा”
2 शाळा उघडल्याच नाही, पूर्ण फी का भरायची?; सर्वोच्च न्यायालयाकडून पालकांना मोठा दिलासा
3 Oxygen Shortage: “तुम्ही आंधळे असू शकता आम्ही नाही”; उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले
Just Now!
X