जागतिक महामारीमुळे सर्वाधिक होरपळलेल्या मध्य पूर्व देशात, दिवसेंदिवस कोविड-19 च्या रूग्णसंखेत वाढ होत आहे. ही करोना व्हायरसची चौथी लाट असू शकते, असा इशारा इराणचे पंतप्रधान हसन रूहानी यांनी आज(शनिवार) दिला.

“खुजस्तानच्या दक्षिण-पश्चिम प्रांतातील काही शहरं हाय रिस्क झोनमध्ये आली आहेत. याचा अर्थ ही करोना व्हायरसच्या चौथ्या लाटेची सुरूवात आहे. आपण सर्वांनी याकरीता सतर्क राहून हे थांबवायला हवं, ही आपल्या सर्वांसाठी एक चेतावणी आहे.” असे मत रूहानी यांनी यावेळी मांडलं. इकॉनॉमिक टाईम्सने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

८० दशलक्षपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात कोविडमुळे आतापर्यंत ५९ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ लाखांपेक्षा पेक्षा जास्त लोकांना या रोगाची लागण झाली आहे.

डिसेंबरच्या उत्तरार्धपासून इराणमध्ये अधिकृतपणे ७ हजार पेक्षा कमी दैनंदिन संक्रमणांची नोंद झाली आहे. परंतु फेब्रुवारीच्या सुरूवातीपासूनच या संख्येत वाढ होताना दिसत आहे.