News Flash

चिंता वाढवणारी बातमी! फ्रान्समध्ये आढळला नवीन करोना विषाणूंचा पहिला रुग्ण

वेगाने संसर्ग होणारा करोनाचा हा नवा प्रकार अनेक देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे

संग्रहित (AP/PTI)

ब्रिटनमध्ये नवीन करोना विषाणूचा प्रकार समोर आला असून फ्रान्समध्ये पहिला रुग्ण सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. वेगाने संसर्ग होणारा करोनाचा हा नवा प्रकार अनेक देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर ५० हून अधिक देशांनी ब्रिटनमधील वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. एएफपीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

दरम्यान फ्रान्समधील हा पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये वास्तव्यास होता. लंडन येथून १९ डिसेंबरला तो परतला होता. या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणं दिसत नसून फ्रान्समधील आपल्या घऱात विलगीकरणात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. २१ डिसेंबरला वैद्यकीय तपासणी केली असताना त्याला करोनाच्या नव्या विषाणूंची लागण झाली असल्याचं समोर आलं.

फ्रान्समध्ये करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात केली आहे. यावेळी कोणामध्ये लक्षणं आढळली तर त्यांना विलगीकरणात ठेवलं जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 9:42 am

Web Title: france confirms first case of british virus variant sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नऊ लाख शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन!; काँग्रेस सत्तेत असणाऱ्या ‘या’ राज्याने दिलं कर्जमाफीचं गिफ्ट
2 “सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार”; मोदींच्या भाषणावर शेतकरी संघटनांची प्रतिक्रिया
3 प्रकाश जावडेकरांचं राहुल गांधींना जाहीर आव्हान; म्हणाले…
Just Now!
X