28 September 2020

News Flash

काश्मीर द्विपक्षीय मुद्दाच, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी केलं स्पष्ट

काश्मीरसह सर्व विषय भारत-पाकिस्तानमधले दि्वपक्षीय मुद्दे आहेत. आम्हाला तिसऱ्या देशाला त्रास द्यायचा नाही असे मोदी यांनी सांगितले.

फ्रान्समधील जी ७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प आणि मोदी यांनी या भेटीत काश्मीरसह वेगवगेळया मुद्दांवर चर्चा केली. मोदींनी यावेळी ट्रम्प यांच्यासमोर काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले. दोन्ही देश आपसातील मतभेद सोडवतील असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.

काश्मीरसह सर्व विषय भारत-पाकिस्तानमधले दि्वपक्षीय मुद्दे आहेत. आम्हाला तिसऱ्या देशाला त्रास द्यायचा नाही असे मोदी यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्दावर मध्यस्थी करण्याची वारंवार तयारी दाखवत होते. पण आता त्यांनी माघार घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांचे मतभेद सोडवतील असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

काश्मीर मुद्दावर काल रात्री आम्ही बोललो. काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे मोदींचे मत आहे. ते पाकिस्तान बरोबर चर्चा करुन नक्कीचे काही तरी चांगले घडवून आणतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. काश्मीर प्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरु आहे. पण ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दावर आज जी भूमिका मांडली  तो एकप्रकारे भारताचा राजनैतिक विजय आहे. महत्वाचं म्हणजे ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी काश्मीर द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्दे केल्यापासून पाकिस्तान आगपाखड करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान विजयी झाले तेव्हा त्यांना शुभेच्छा देताना आपण गरीबीविरोधात लढले पाहिजे हे बोललो होते असे नरेंद्र मोदी संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 4:19 pm

Web Title: france g seven summit prime minister narendra modi meet donald trump kashmir article 370 dmp 82
Next Stories
1 अधीर रंजन यांनी स्वतःच्या पक्षाला जमिनीत गाडलं – राज्यपाल मलिक
2 तामिळनाडूत आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना; ३७ जणांना अटक
3 Video: विरोधकांचा ‘मारक शक्ती’चा प्रयोग भाजपा नेत्यांच्या निधनाला कारणीभूत : साध्वी प्रज्ञासिंह
Just Now!
X