News Flash

फ्रान्समध्ये भरधाव कार गर्दीत घुसवणाऱ्या चालकाला अटक, तीन जखमी

पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून तो २८ वर्षांचा आहे.

फ्रान्समध्ये भरधाव कार गर्दीत घुसवणाऱ्या चालकाला अटक, तीन जखमी
प्रतिकात्मक छायाचित्र

फ्रान्समधील तुलूझ या शहरात एका माथेफिरुने भरधाव कार गर्दीत घुसवल्याने तीन जण जखमी झाले. पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून हा दहशतवादी हल्ला आहे का या दिशेनेही तपास सुरु आहे.

दक्षिण फ्रान्समध्ये तुलूझ हे शहर असून या शहरात शुक्रवारी एका माथेफिरुने शाळेजवळील गर्दीत कार घुसवून तिघांना चिरडले. यात जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींपैकी दोघे जण चीनचे नागरिक असल्याचे समजते.

पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून तो २८ वर्षांचा आहे. त्याच्यावर यापूर्वीही किरकोळ स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला मानसिक आजार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. संबंधित तरुण हा पोलिसांच्या वॉच लिस्टवर नव्हता, त्याचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची गोपनीय माहिती देखील मिळाली नव्हती, मात्र तरीदेखील आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत, असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. मात्र या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 11:08 pm

Web Title: france toulouse attack car hits crowd outside school several injured driver detained
Next Stories
1 खवय्यांना दिलासा, खानपान स्वस्त; जीएसटीत घसघशीत कपात
2 पाकिस्तान नरमले, कुलभूषण जाधव यांना पत्नीला भेटण्याची परवानगी
3 भारतावर ‘गब्बर सिंग टॅक्स’ लादू देणार नाही : राहुल गांधी
Just Now!
X