प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा केला जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही धान्य मिळणार असंही स्पष्ट करण्यात आलं. प्रति महिना ५ किलो धान्य गरीबांना दिलं जाणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. याचा फायदा ८ कोटी प्रवासी मजुरांना होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. वन नेशन आणि वन रेशन कार्ड ही योजनाही येत्या काळात आम्ही आणतो आहोत. ज्यामुळे उद्या असं काही संकट आलं तर गरीबाना देशातल्या कोणत्याही रेशन डेपोमधून धान्य उपलब्ध होऊ शकेल असंही स्पष्ट करण्यात आलं.

आणखी वाचा- प्रत्येक राज्यात लागू होणार ‘वन-नेशन वन-रेशन कार्ड’ योजना- निर्मला सीतारामन

स्थलांतरित मजुरांची केंद्र सरकारला काळजी आहे. आम्ही त्यांच्यासाठी निवारा केंद्र उभारली आहेत. तसंच त्यांच्या तीनवेळच्या जेवणाची सोय केली आहे. त्यांच्या आरोग्य चिकित्सेचीही सोय केली आहे असं आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या गोष्टी मागील दोन महिन्यात करण्यात आल्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. १२ हजार बचतगटांकडून ३ कोटी मास्क आणि दीड लाख लीटर पर्यंत सॅनिटायझरची निर्मिती केली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन महिन्यात ७ हजार २०० बचतगटांची स्थापना झाली आहे असंही स्पष्ट करण्यात आली आहे. स्थलांतरित मजुरांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं.

आणखी वाचा- मध्यमवर्गीय, मच्छीमार, फेरीवाल्यांसाठी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय

स्थलांतरित मजूर, गरीब, फेरीवाले, छोट्या प्रमाणात शेती करणारे शेतकरी यांच्यासाठी घोषणा होणार आहेत असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी आजच दोनच घोषणा असल्या तरीही पुढेही त्यांच्यासाठी घोषणा असणार आहेत. कुणीही मोदी सरकार शेतकऱ्यांना विसरलं असं म्हणू नये असंही निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं. गरीबांच्या कल्याणासाठीच हे सरकार आहे. तसंच गरीब कल्याण योजनेतूनही स्थलांतरीत मजुरांना मदत देण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

काल MSME सेक्टरसाठी काही योजना जाहीर केला. आज गरीब, प्रवासी मजूर, छोट्या प्रमाणात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज तरतुदी जाहीर करतो आहोत असंही स्पष्ट करण्यात आलं.