21 January 2021

News Flash

स्कॉटलंडमध्ये ‘सॅनिटरी पॅड्स’ मोफत

एकमताने कायदा मंजूर

 

महिलांना ‘सॅनिटरी पॅड्स’ मोफत उपलब्ध करून देणारा स्कॉटलंड हा पहिला देश ठरला आहे. स्कॉटिश संसदेने याबाबतचा कायदा मंगळवारी एकमताने मंजूर केला.

मासिक पाळी आरोग्य उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार आता स्थानिक अधिकाऱ्यांना महिलांची मासिक पाळी आरोग्य उत्पादने मोफत उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक राहणार आहे. सामाजिक केंद्रे, युवा गट, औषध दुकाने या ठिकाणी ही उत्पादने मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी २०२२ पर्यंत ८.७ दशलक्ष पौंडाचा खर्च येणार आहे. ही उत्पादने शाळा, महाविद्यालये व विद्यापीठात उपलब्ध केली जाणार आहेत, असे या विधेयकात प्रमुख भूमिका पार पाडणाऱ्या मोनिका लेनॉन यांनी सांगितले. त्यांनी एप्रिल २०१९ मध्ये हे विधेयक प्रथम मांडले होते. या नवीन कायद्याचे महिला हक्क गटांनी स्वागत केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 12:14 am

Web Title: free sanitary pads in scotland abn 97
Next Stories
1 गर्दीवर नियंत्रण ठेवा!
2 पश्चिम बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनावर दगडफेक; १५ दिवसांत दुसरा हल्ला
3 Cyclone Nivar : तामिळनाडूमधून एक लाखापेक्षा अधिक जणांना सुरक्षितस्थळी हलवलं
Just Now!
X