काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये महिलांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये याचा लाभ महिला वर्गाला मिळण्यास सुरूवात होईल, असेही त्यांनी सांगितले होते. असे झाल्यास मोफत सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणारे दिल्ली हे देशातील पहिले ठिकाण असेल.

परंतु आज अशी अनेक शहरे आणि देश आहेत, ज्या ठिकाणी यापूर्वीच सार्वजनिक वाहतुकीची सर्वांना मोफत सुविधा देण्यात येत आहे. सध्या जर्मनीही आपल्या देशातील सर्वाधिक प्रदुषण असलेल्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा विचार करत आहे. जेणेकरून प्रवासी आपली खाजगी वाहने सोडून सार्वजनिक वाहुतकीचा वापर करतील.

लक्झमबर्ग हा जगातील असा पहिला देश आहे, ज्याने 2020 पासून सार्वजनिक वाहतूक सर्वत्र सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपीय देशांमध्ये मोफत सार्वजनिक वाहतुकीचा मोफत लाभ घेता येत असला तरी संपूर्ण देशात पूर्णत: मोफत सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरवणारा लक्झमबर्ग हा पहिला देश आहे. बेल्जिअममधील हस्सेल्ट या शहरात 1997 पासूनच सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत करण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयानंतर 2006 पर्यंत प्रवाशांच्या संख्येत 13 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा हा निर्णय रद्द करण्यात आला होता. परंतु आता केवळ 19 वर्षांखालील मुलांनाच सार्वजनिक वाहतुकीची सेवा मोफत देण्यात येते. यानंतर त्या ठिकाणी वायू प्रदूषण कमी झाल्याचेही समोर आले होते.

जर्मनीनेही मोफत वाहतूक सेवेसाठी बॉन, एसेन, रॉटलिंग, मॅनहॅम आणि हेरनबर्ग या शहरांची निवड केली आहे. एस्टोनियाची राजधानी टालिनमध्ये 6 वर्षांपूर्वीच सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात आली होती. मोफत सेवा सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी प्रशासनाने मतदानही घेतले होते. दरम्यान, 75 लोकांनी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याच्या बाजूने मतदान केले होते. मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना रजिस्टर करावे लागते. तसेच ग्रीन कार्डसाठी 2 पौड्सही द्यावे लागतात.