‘भारत माता की जय’ म्हणायला कुठल्याही भारतीयाची हरकत असता कामा नये. या विषयावर दुमत किंवा चर्चा होऊच शकत नाही असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतील बैठकीत ते बोलत होते.
अरुण जेटली म्हणाले की, मतभेद, मतांतराला भारताचे संविधान पूर्ण परवानगी देते पण देशाचे नुकसान करायला परवानगी देत नाही. दिवाळखोरी विधेयकावर बहुतांश पक्ष अनुकूल आहेत, आम्ही एकमत घडवून आणण्याचा प्रयत्न करु, जीएसटी विधेयकावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही अरुण जेटली यांनी यावेळी सांगितले. आसाममध्ये भाजप निर्णायक विजय मिळवेल. काँग्रेसची महत्वाकांक्षा कमी होत चाललीय. बिहार, बंगाल, तामिळनाडूतील राजकीय तडाजोडी पाहिल्यास हे सहज दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. आरक्षणाला भाजपचा पाठिंबा होता आणि राहील. सुशासन हा जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपचा अजेंडा असेल असे त्यांनी नमूद केले.