News Flash

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॅ. अब्बास अली कालवश

इंडियन नॅशनल आर्मीचे सदस्य आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॅ. अब्बास अली (९४) यांचे शनिवारी येथे निधन झाले.

| October 12, 2014 02:18 am

इंडियन नॅशनल आर्मीचे सदस्य आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॅ. अब्बास अली (९४) यांचे शनिवारी येथे निधन झाले.  
अली हे दुसरे जागतिक महायुद्ध सुरू होण्यापूर्वी ब्रिटिश इंडियन आर्मीत सामील झाले. मात्र सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीचा उठाव केला तेव्हा अली यांनी इंडियन नॅशनल आर्मीत प्रवेश केला.त्यानंतर अल्पावधीतच त्यांना अटक करण्यात आली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यानंतर अली यांनी  राजकारणात प्रवेश केला. आणीबाणीच्या वेळी त्यांना पुन्हा अटक झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 2:18 am

Web Title: freedom fighter capt abbas ali passes away
Next Stories
1 थरूर यांच्यावर कारवाई ?
2 पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
3 संसद आदर्श ग्राम योजनेची पंतप्रधानांकडून सुरुवात
Just Now!
X