News Flash

रशियाने हवाई क्षेत्र बंद केल्याने फ्रान्सचे विमान वळवले

लष्करी अभ्यासामुळे आपले हवाई क्षेत्र बंद करीत असल्याची घोषणा रशियाने अचानक केल्यामुळे ४९५ प्रवाशांना आणि २२ कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे फ्रान्सचे विमान बुधवारी तातडीने वळवून जर्मनीतील

| March 27, 2014 06:08 am

लष्करी अभ्यासामुळे आपले हवाई क्षेत्र बंद करीत असल्याची घोषणा रशियाने अचानक केल्यामुळे ४९५ प्रवाशांना आणि २२ कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे फ्रान्सचे विमान बुधवारी तातडीने वळवून जर्मनीतील हेम्बर्ग विमानतळावर उतरवण्यात आले.  विमान कंपनीने स्पष्ट केले की,   हे प्रवासी विमान शांघाय ते पॅरिस असे जात होते. मात्र ते जर्मनीतील हेमबर्ग येथे पहाटे पाचच्या सुमारास उतरवण्यात आले. लांबचा प्रवास करावा लागल्यामुळे विमानातील इंधन संपत आले होते. त्यामुळे विमान खाली उतरवून इंधन भरल्यानंतर दीड तासाने ते पुढील प्रवासाला निघाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 6:08 am

Web Title: french plane diverted after russia closes airspace
Next Stories
1 पाकिस्तानची मदत एक कोटी डॉलरने कमी करून अमेरिका युक्रेनला देणार
2 अंतराळवीरांना स्थानकात पोहोचण्यास विलंब होणार
3 सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूविषयी तर्क थांबवावेत
Just Now!
X