कार्यालयीन कामासाठी (बिझनेस ट्रीप) दौऱ्यावर असताना एका अनोळखी महिलेशी शरीरसंबंध ठेवताना एका फ्रेंच व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू ‘कामाच्या ठिकाणी झालेला अपघाती मृत्यू’ असल्याचा निकाल पॅरीसमधील न्यायलयाने दिला आहे. या व्यक्तीच्या कुटुंबाला कंपनीने नुकसानभरपाई द्यावी असा आदेश न्यायलयाने दिला आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार मृत व्यक्ती अनोळखी स्त्रीबरोबर शारीरिक संबंध ठेवत असतानाच त्याला हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

फ्रान्समध्ये रेल्वे वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या टीएसओ कंपनीतील एम झेव्हियर्स या व्यक्तीचा कंपनीच्या कामासाठी गेलेल्या दौऱ्या दरम्यान मृत्यू झाला. २०१३ साली कंपनीच्या कामासाठी झेव्हियर्स फ्रान्समधीलच लॉरीट या ठिकाणी गेले होते. तेथेच एका अनोळखी महिलेबरोबर शरीरिक संबंध ठेवताना त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू कामाच्या ठिकाणी झालेला अपघाती मृत्यू असल्याने यासंदर्भात कंपनीने कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी झेव्हियर्स यांच्या नातेवाईकांनी केली. मात्र कंपनीने यासाठी नकार दिल्यानंतर झेव्हियर्स यांच्या कुटुंबियांनी कोर्टात खटला दाखल केला.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

‘झेव्हियर्स यांचा मृत्यू शरीरसंबंध ठेवताना झाला आहे. या दौऱ्यावर असताना शरीरसंबंध ठेवणे हा त्यांच्या कामाचा भाग नव्हता. स्वत:च्या खासगी कामासाठी या कर्मचाऱ्याने कार्यलयीन कामामधून विश्रांती घेत असताना केलेल्या कृत्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच कंपनीने दिलेल्या हॉटेलमध्ये न राहता हा कर्मचारी दुसऱ्या हॉटेलमध्ये असल्याने या मृत्यूशी कंपनीचा संबंध नाही,’ अशी बाजू कंपनीने कोर्टात मांडली. कर्चमाऱ्याचा मृत्यू हा एका अनोळखी महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवताना झाला असून या महिलेचाही कंपनीशी काहीही संबंध नसल्याने या प्रकरणात कंपनीकडे भरपाई मागणे अयोग्य असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.

मात्र न्यायलयाने हा कर्मचारी कंपनीसाठी दुसऱ्या ठिकाणी गेला होता. त्यामध्ये तो खासगी कामात होता की कंपनीच्या हे महत्वाचे नसून त्याचा मृत्यू झाला हे जास्त गंभीर आहे. तसेच शरीर संबंध ठेवणे ही अंघोळ करणे किंवा जेवण करण्यासारखी दैनंदिन क्रिया असल्याचे मतही न्यायलयाने व्यक्त केले.