कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बी एस येडियुरप्पा यांच्या सरकारसमोर नवीन संकट निर्माण झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील जलसंवर्धन मंत्री रमेश जारकीहोली आणि एका अज्ञात महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अनेक दाक्षिणात्य वृत्तवाहिन्यांवर दाखवला जात आहे. याच प्रकरणी आता समाजसेवक असणाऱ्या दिनेश कालाहल्ली यांनी बेंगळुरुमधील कब्बन पार्क पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये व्हायरल व्हिडीओमधील मंत्री नोकरी देण्याच्या नावाखाली महिलेचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करण्यात आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी या प्रकरणामध्ये अद्याप अधिकृतरित्या कोणतीही तक्रार दाखल करुन घेतलेली नसल्याचं द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. पोलीस उपायुक्त एम. एन. अनुचेथ यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस सध्या मिळालेल्या तक्रारीमध्ये किती सत्यता आहे हे तपासून पाहत आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी या प्रकरणासंदर्भात आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत एक बैठकही घेतल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणामध्ये रमेश यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याच्याकडे राजीनामा मागितला जावा यावर या बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्राथमिक शिक्षण मंत्री सुरे कुमार यांनी, “पक्षातील नेते यासंदर्भातील निर्णय घेतील,” असं म्हटलं आहे.

भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी या प्रकरणावर मौन बाळगलं आहे. ज्या रमेश यांच्यावर आरोप करण्यात येत आहे त्यांनाही यासंदर्भात कोणतही भाष्य केलेलं नाही. रमेश यांनी आपला फोन बंद ठेवला आहे. ६० वर्षीय रमेश हे सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या येडियुरप्पा सरकारमधील महत्वाचे मंत्री आहेत. रमेश हे कर्नाटकमधील बेळगावमधील लोकप्रिय मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचे १७ आमदार फोडण्यामध्ये भाजपाला मदत केली होती. याच घटनेनंतर भाजपाला राज्यात सरकार बनवता आलं आणि जुलै २०१९ मध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं सरकार सत्तेत आलं.

मुख्यमंत्री पदाची इच्छा बाळगणारे रमेश यांचे संपूर्ण कुटुंबच राजकारणामध्ये सक्रीय आहे. बेळगावमध्ये रमेश आणि त्यांचे तीन भाऊ हे सक्रीय राजकारणामधील आघाडीचे नेते आहेत. रमेश यांची ही सेक्स रॅकेटसंदर्भातील सीडी बेळगाव लोकसभेच्या जागेसाठी असणाऱ्या पोटनिवडणुकीच्याआधी समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर मागील वर्षी लोकसभेची ही जागा रिक्त झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fresh trouble for bjp in karnataka govt ramesh jarkiholi caught in a sex cd scandal scsg
First published on: 03-03-2021 at 09:52 IST