News Flash

….अन् मित्रानेच घात केला; जेवणात गुंगीचं औषध मिळवून बेशुद्धवस्थेत केला बलात्कार

गुंगीचं औषध देऊन २६ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर मित्राकडूनच बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Rape, MP, Bhopal
गुंगीचं औषध देऊन २६ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर मित्राकडूनच बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

गुंगीचं औषध देऊन २६ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर मित्राकडूनच बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारादरम्यान आरोपीने व्हिडीओ शूट केला असून त्याच्या आधारे आपल्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. आरोपीने व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज करण्याची धमकी दिली होती असंही तिने सांगितलं आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमधील निशातपुरा येथे ही घटना घडली आहे.

१४ ऑगस्टला आरोपी गोविंद अहिरवारने पीडितेला कॉलेजला सोडतो असं सांगितलं. यानंतर त्याने रस्त्यात काही खायला घेतलं आणि त्यात गुंगीचं औषध मिसळलं. अन्न खाल्ल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत पीडितेला आऱोपीच्या भाड्याच्या घरी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यावेळी त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडीओ शूटदेखील केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपीने पीडितेला कॉलेजला सोडताना रस्त्यात एका ठिकाणी थांबून खायला घेतलं होतं. पीडितेला कळू न देता त्याने त्यात गुंगीचं औषध मिसळलं. यानंतर त्याने निशातपूरा येथील भाड्याच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडीओ शूट केला”.

यानंतर आरोपी पीडितेला व्हिडीओची भीती दाखवत ब्लॅकमेल करत होता. आरोपी सतत त्रास देत असल्याने अखेर पीडितेने आई-वडिलांना सगळा घटनाक्रम सांगितला आणि त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस सध्या तपास करत असून आरोपी सध्या फरार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 1:05 pm

Web Title: friend rapes nursing student in bhopal after giving her food laced with sedatives sgy 87
Next Stories
1 अफगाणिस्तानमध्ये शरिया कायद्यानुसार अंमल चालणार; तालिबानची घोषणा
2 विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी!
3 भारतात मुस्लिम कधीच बहुसंख्याक बनू शकत नाहीत: दिग्विजय सिंह
Just Now!
X