News Flash

लेह ते दिल्ली : नवजात चिमुकल्यासाठी १००० किलोमीटरवरून येतं आईचं दूध

बाळाला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आलं होतं दिल्लीत

(संग्रहित छायाचित्र)

आपल्या बाळासाठी आई-वडिल येईल ते संकट आपल्यावर घ्यायला तयार असतात. तसंच त्याला मोठं करण्यासाठी आई-वडिल आपलं आयुष्यही वेचतात. दरम्यान, नवजात बाळासाठी तब्बल १ हजार किलोमीटर अंतरावरून जर आईचं दूध येत असेल तर हे एकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. पण ही घटना खरी आहे. शालीमार बाग येथील मॅक्स रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासाठी त्याचे आई-वडिल दिवसरात्र एक करत आहेत. आपल्या मुलाला आईचं दूध मिळावं यासाठी दररोज एक हजार किलोमीटर दूर लेह पासून दिल्लीत विमानाद्वारे दूध आणलं जातं. गेल्या एका महिन्यापासून हे निरंतर सुरू आहे. या रुग्णालयात बाळावर एक शस्त्रक्रिया करण्यात आल. परंतु त्याची आई लेहमध्येच अडकली. बाळापर्यंत आईचं दूध पोहोचवणं आवश्यक होतं. त्यामुळे दररोज लेहमधून बाळासाठी आईचं दूध पाठवलं जातं. यामुळे डॉक्टरांनादेखील आश्चर्य वाटत आहे. दरम्यान, या नंतर बाळाच्या प्रकृतीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे.

पुढील आठवड्यात बाळाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. १६ जून रोजी बाळाचा जन्म लेहमध्ये सिझेरियन पद्धतीनं झाला. बाळाची श्वसननलिका आणि जेवणाची नलिका ही एकत्र जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मॅक्स रुग्णालयातील डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर बाळाच्या मामानं त्याला दिल्लीतील रुग्णालयात नेलं. सिझेरियन झाल्यामुळं बाळाच्या आईला दिल्लीत जाता आलं नाही. शस्त्रक्रियेसाठी केवळ दोनच दिवस असल्यानं त्याला त्वरित नेणं भाग होतं. तर दुसरीकडे बाळाचे वडील जिकमेट वांगडू हे कर्नाटकात शिक्षक म्हणून काम करतात. त्यांनादेखील याची माहिती मिळाल्यानंतर ते त्वरित दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर १९ जून रोजी बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

“आईचं दूध हे बाळासाठी खुप महत्त्वाचं असल्याचं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं. लेहमधून इथपर्यंत आईचं दूध आममं आमच्यासाठी खुप आव्हानात्मक होतं. परंतु आम्ही निश्चय केला होता. यामध्ये आमच्या मित्रांचीही खुप मोठी मदत झाली,” असं जिकमेट वांगडू म्हणाले. “विमानतळावर आमचे काही मित्र काम करतात. ते कोणत्या ना कोणत्या प्रवाशाच्या मदतीनं आम्हाला दिल्ली विमानतळापर्यंत दूध पाठवतात. सकाळी लेह ते दिल्ली विमानातून एका तासात ते दूध पोहोचवलं जातं. मामा किंवा मी आमच्यापैकी कोणीही दिल्ली विमानतळापर्यंत जाऊन बाळासाठी आईचं दूध घेऊन येतो,” असंही ते म्हणाले.

विमानतळावरील कर्मचाऱ्यांनीदेखील यासाठी त्यांचं कौतुक केलं. २० जून पासून रोज लेह ते दिल्ली बाळासाठी आईचं दूध पाठवलं जात आहे. बाळाच्या प्रकृतीतही सुधारणा होतं असल्याचंही ते म्हणाले. सुरूवातीला मिल्क बँकमधून दूध आणण्यावर विचार केला होता. परंतु आईचं दूध हे बाळासाठी खुप आवश्यक असतं असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर आम्हीही ठोस निर्णय घेतल्याचं वांगडू म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 1:58 pm

Web Title: from leh to delhi moms milk for her baby from 1000 km away flight airport jud 87
Next Stories
1 काँग्रेस हायकमांडकडून अशोक गेहलोत यांची कानउघडणी
2 Coronavirus: आईला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा एकामागोमाग मृत्यू; देशातील पहिलीच अशी ह्रदयद्रावक घटना
3 धक्कादायक! …म्हणून जिल्हा रुग्णालयात ६ वर्षाच्या नातवालाच ढकलावं लागलं आजोबांचं स्ट्रेचर
Just Now!
X