सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आजपसान ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांअगोदरच सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. शिवाय, या ट्रेनना फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे नाव देखील देण्यात आले आहे. २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या ट्रेन्स धावणार आहेत.

रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ट्रेन कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे.

सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या, मात्र एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते की, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील. तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते. त्यानुसार आता ३९२ विेशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. रेल्वेकडून या विशेष ट्रेन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांना मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंगचे न पालन करणे महागात पडू शकते. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास रेल्वेकडून दंड आकारला जाऊ शकतो.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.

सद्यस्थितीस एकूण ६६६ मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू आहेत. तर, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमीत ट्रेन्स अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.