आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात घट झाल्याने सलग पाचव्या दिवशी मुंबईसह देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात आली. सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८६ रुपये ९१ पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ७८ रुपये ५४ पैशांवर आले.

गेल्या आठवड्यात गुरुवारी पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. यानंतर सलग पाचव्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात आली. सोमवारी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ३० पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर २८ पैशांनी स्वस्त झाले. सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८६ रुपये ९१ पैसे तर डिझेलचे प्रतिलिटर दर ७८ रुपये ५४ रुपयांवर आले. दिल्लीतही पेट्रोल ३० तर डिझेल २७ पैशांनी स्वस्त झाले. गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबईत पेट्रोलचे दर एकूण १ रुपये ३९ पैसे तर डिझेलचे दर ७८ पैशांनी कमी झाले आहेत.

रुपयाचे अवमूल्यन आणि कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे देशभरात दोन महिन्यांपासून इंधनाच्या दरात वाढ होत होती. यावरुन मोदी सरकारविरोधात नाराजीही पसरली होती. शेवटी केंद्र व राज्य सरकारने इंधनावरील करात कपात करत ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, यानंतरही इंधनदरवाढ सुरूच असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत नव्हता. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाची किंमत कमी झाल्याने तेल कंपन्यांनी ग्राहकांना याचा लाभ दिला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर (दर प्रतिलिटरनुसार):

पुणे
पेट्रोल – ८६. ७१ रुपये
डिझेल – ७७.१० रुपये

नागपूर
पेट्रोल – ८७. ४० रुपये
डिझेल – ७९.०६ रुपये

औरंगाबाद
पेट्रोल – ८७. ९६ रुपये
डिझेल – ७९. ५९ रुपये