नवी दिल्ली : पश्चिम बंगालसह अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच मंगळवारी इंधन दरात वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १८ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

तेल कंपन्यांनी काही काळ इंधन दरवाढ टाळली होती. उलट २४ मार्चपासून चार वेळा इंधन दरात कपात करण्यात आली होती. १५ एप्रिल रोजीही तेल कंपन्यांनी दरकपात केली. तेल कंपन्यांनी चार वेळा पेट्रोल दरात एकूण ६७ पैसे तर डिझेल दरात ७४ पैशांनी घट केली होती. मात्र, मंगळवारी पुन्हा दरवाढ करण्यात आली. त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलचा प्रतिलिटर दर ९०.५५ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ८०.९१ रुपये इतका झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९६.९५ रुपये इतका झाला आहे.