पेट्रोल-डिझेलची दरवाढ आता रोजचीच झाली आहे. त्यानुसार आज (रविवार) पुन्हा इंधन दरवाढ झाली आहे. यामध्ये पेट्रोल ९ पैशांनी तर डिझेल १७ पैशांनी महागले आहे. या ताज्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर ९०.८४ रुपये प्रति लिटरवर गेला असून डिझेल ७९.४० रुपये प्रती लिटरपर्यंत पोहोचले आहे. तर, दिल्लीमध्ये पेट्रोल ८३.४९ रुपये प्रति लिटर, डिझेल ७४.७९ रुपये प्रति लिटर झाले आहे.


सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीयबाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.

पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीवरुन मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे.