22 September 2020

News Flash

इंधन दरवाढ सुरूच, पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग

इंधनाच्या भडकणाऱ्या दरांविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.

संग्रहित छायाचित्र

इंधनाच्या दरात दररोज वाढ सुरूच आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. शनिवारी पेट्रोलचा मुंबईतला दर ८७ रूपये ७७ पैसे आहे. तर डिझेलचा दर ७६ रूपये ९८ पैसे इतका आहे. तर दिल्लीतला शनिवारचा दर ८० रूपये ३८ पैसे लिटर इतका आहे तर डिझेलचा दर ७२ रूपये ५१ पैसे इतका आहे. कालच्या तुलनेत आज पेट्रोलचे दर ३८ पैशांनी महागले आहेत.

सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीयबाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.

पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीवरुन मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. इंधनाच्या भडकणाऱ्या दरांविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 7:00 am

Web Title: fuel price hike petrol diesel prices mumbai delhi
Next Stories
1 अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा
2 भारत इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी आला होता कर्जबुडव्या विजय मल्ल्या
3 हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती करू शकेल -मोहन भागवत
Just Now!
X