28 September 2020

News Flash

इंधनाचा भडका, पेट्रोल, डिझेल महागले

मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर ८७. ३९ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर एक लिटर डिझेलचे दर ७६. ५१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

इंधनाच्या दरात सातत्याने वाढ सुरुच असून शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटरमागे ४८ पैसे आणि डिझेल प्रति लिटरमागे ५५ पैशांनी महागले. मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर ८७. ३९ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर एक लिटर डिझेलचे दर ७६. ५१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

गटांगळ्या खाणारा रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे देशात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८७. ३९ रुपये आणि डिझेलचे प्रति लिटर ७६. ५१ रुपये इतके झाले आहे. तर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ७९. ९९ रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिर ७२. ०७ रुपये इतके आहे.

प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.

दरम्यान, पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीवरुन मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. इंधनाच्या भडकणाऱ्या दरांविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर

पुणे
पेट्रोल – ८७. १९ रुपये
डिझेल – ७५. १४रुपये

नागपूर
पेट्रोल – ८७. ८७ रुपये
डिझेल – ७७. ०४ रुपये

औरंगाबाद
पेट्रोल – ८८. ४४ रुपये
डिझेल – ७७. ५७ रुपये

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 7:36 am

Web Title: fuel price hike petrol diesel prices mumbai pune aurangabad iocl
Next Stories
1 भारतातून चोरीला गेलेल्या १२ व्या शतकातील मूर्ती अमेरिकेने केल्या परत
2 हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे निधन
3 स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमुळे देशाचे विभाजन-फारूख अब्दुल्ला
Just Now!
X