25 February 2021

News Flash

धक्कादायक : हवाई दलाच्या विमानाच्या इंधनाची टाकीच शेतात पडली

मोठी दुर्घटना टळली; हवाई दलाचे चौकशीचे आदेश

भारतीय वायु सेनेच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ जेट विमानाची इंधन टाकी मंगळवारी सकाळी ८ वाजुन ४० मिनिटांनी तामिळनाडूमधील कोईम्बतुर जिल्ह्यातील एका शेतात पडली. विमान उड्डाण घेत असताना हा प्रकार घडला.

या घटनेनंतर सुलुर विमानतळावर हे विमान यशस्वीरित्या उतरवण्यात आले. या घटनेत कोणतेही अन्य नुकसान झाले नाही. भारतीय वायु सेनेने घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

या इंधन टाकीची क्षमता १२०० लिटर आहे. ही टाकी पडल्यामुळे शेतात तीन फुटाचा खड्डा झाला. घटनास्थळी तुरळक आग देखील लागली होती जी लगेच विझवल्या गेली.  या प्रकारामुळे एखादी मोठी दुर्घटना देखील घडू शकली असती मात्र सुदैवाने ती टळली. तेजस एक हलके लढाऊ विमान आहे व अन्य लढाऊ विमानांप्रमाणेच त्याचेही आयुर्मान किमान ३० वर्षे असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 3:12 pm

Web Title: fuel tank of the lca tejas aircraft of the indian air force fell down in farm land msr87
Next Stories
1 भाजपा आमदाराच्या ‘बॅटिंग’वर मोदी भडकले !
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 प्रत्यार्पणाविरुद्ध मल्याच्या अपिलावर आज सुनावणी
Just Now!
X