News Flash

विमानातून इंधन गळती, कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी जाहीर

मोठी दुर्घटना टळली

एअर इंडिया (फाईल फोटो)

कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी (आपत्कालीन) स्थिती जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी रात्री एअर इंडिया विमानातून अचानक इंधनगळती सुरू झाल्यानंतर विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. कोणत्याही प्रकारची जिवीतहाणी झालेली नाही. विमानतळ आणि विमानातील सर्वजण सुखरूप आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री विमान क्रमांक एआय-३३५ बेकाँकहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून अचानक इंधन गळतीला सुरूवात झाली. विमानामध्ये १५० प्रवाशी होतो. सर्वजण सुखरूप आहेत.

शनिवारी रात्री एअर इंडियाचे एआय-३३५ बेकाँकहून दिल्लीला निघाले होते. विमानाने भारतीय हवाई क्षेत्र प्रवेश केल्यानंतर तांत्रिक अडचण आल्याचे वैमानिकाला समजले. त्यानंतर वैमानिकाने कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिग करण्याचा निर्णय घेतला. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 12:31 pm

Web Title: full emergency was declared at kolkata airport
Next Stories
1 दलित मतांसाठी भाजपाचे ‘भीम महासंगम’, शिजवणार ५००० किलो खिचडी
2 ‘नितीन गडकरींना उपपंतप्रधान करा, पक्षाचे नेतृत्व शिवराजसिंह चौहान यांना द्या’
3 मनोहर पर्रिकर यांच्या जीवाला धोका – काँग्रेस
Just Now!
X