News Flash

अमेरिकेकडून पाकिस्तानला ‘फंडिंग’ सुरूच, ७० कोटी डॉलरचा प्रस्ताव मंजूर

अमेरिकेकडून अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या अभियानाला समर्थन देण्याच्या बदल्यात मदत

संग्रहित छायाचित्र

अमेरिकन काँग्रेसने पाकिस्तानला ४.५ हजार कोटी रूपयांच्या (७० कोटी डॉलर) मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. अमेरिकेकडून अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या अभियानाला समर्थन देण्याच्या बदल्यात पाकिस्तानला ही रक्कम दिली जाणार आहे. अमेरिका आघाडी सहायता निधीकडून (सीएसएफ) ही रक्कम पाकिस्तानला देण्यात येणार आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

हा अधिकार २०१८ च्या राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकरण अधिनियम (एनडीएए-२०१८) च्या सभागृह आणि सिनेटच्या नियमावलीत समावेश करण्यात आला होता. याच आठवड्याच्या प्रारंभीच तो जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानने हक्कानी नेटवर्क आणि लष्कर ए तोयबाविरोधात पाऊल उचलल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव जिम मॅटिस यांनी प्रमाणित केल्यानंतर त्यांना ३५ ते ७० कोटी डॉलरपर्यंत मदत केली जाईल, असे यात म्हटले आहे.

एनडीएएने अमेरिकन संरक्षण विभागाला विनंती केली आहे की, पाकिस्तानने त्यांना मिळालेली मदत दहशतवादी समूहाला पुरवू नये याकडे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने लक्ष ठेवण्याची विनंत एनडीएएने केली आहे. पाकिस्तानमध्ये विविध राजकीय आणि धार्मिक समूहांकडून कथितरित्या होणाऱ्या अत्याचारावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये ख्रिश्चन, हिंदू, अहमदिया, बलाचे, सिंधी आणि हजारा समुदायाचा समावेश आहे.

अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या मदतीचा वापर अल्पसंख्यांक समूहावर अन्याय करण्यासाठी तर वापरला जात नाही ना, याची खात्री मॅटिस यांनी करावी, अशी विनंती विधेयकात करण्यात आली आहे. दरम्यान ‘टोटो न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, शेजारी देशांच्या मदतीशिवाय अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि स्थिरता आणणे शक्य नसल्याचे नाटोने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 8:40 am

Web Title: funding started from the us approved 70 million dollar proposal
Next Stories
1 भाजपचे ‘सुरत – ए – हाल’!
2 अफवेनंतर बांगलादेशात तीस हिंदूंची घरे जाळली
3 परग्रहवासीयांशी संपर्क साधण्याचे चीनचे मनसुबे
Just Now!
X